पोस्ट्स

स्मरण जेआरडींचे

स्मरण जेआरडींचे, २९ नोव्हेंबर २०१८ २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जेआरडी गेले, आज त्यांचा २५ वा स्मृतिदिन ! स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि पायाभूत सोयी आदी क्षेत्रातील प्रगतीची पायाभरणी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली तर औद्योगिक भारताची पायाभरणी जहांगीर रतन दादाभाई टाटा (जेआरडी) यांच्या नेतृत्वाखाली झाली. १८६८ सालीच टाटा उद्योगसमूहाची सुरुवात झाली होती. आधी जमशेटजी टाटा आणि नंतर दोराबजी टाटा यांनी १९३२ सालापर्यंत टाटासमूह बऱ्याच अंगानी मोठा केला होता. एम्प्रेस मिल, ताज हॉटेल, टाटा स्टील, टाटा पॉवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा ऑइल मिल्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, इंडिया सिमेंट, टाटा कन्स्ट्रक्शन, टाटा इलेक्ट्रोकेमिकल्स, टाटा इंडस्ट्रियल बँक आदी संस्था आणि उद्योग १९३२ पर्यंत उभे राहिले होते. १९३२ ते १९३८ या काळात नवरोजजी सकलातवाला टाटा प्रमुख होते. त्यांच्या काळात टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ची सुरुवात झाली. १९३८ साली वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाची धुरा जेआरडींच्या हाती आली.  पुढची ५३ वर्षे ते समूहाचे अध्यक्ष ह

आईचा साठावा वाढदिवस

            लहानपणी शाळेमध्ये कधीतरी आपण 'माझी आई' असा निबंध लिहिलेला असतो. आपण मोठे होत जात असतो तसे निबंधांचे विषय बदलत जातात आणि पुन्हा कधी 'माझी आई' निबंध लिहायची वेळच येत नाही. लहानपणी खाऊ-पिऊ घालणारी, शाळेत पाठवणारी एवढीच आई आपल्याला कळलेली असते. त्यानंतर आपण मोठे होऊ तसे आई या नात्याचे अनेक पदर आपल्याला उलगडत जातात, आपल्याला आपली आई थोडी जास्ती कळू लागते, पण मदर्स डे किंवा आईच्या वाढदिवसाची पार्टी एवढ्यापुरतेच आपण व्यक्त होतो आई विषयी, ते पण खूप वरवरचे. आज म्हटलं पुन्हा एकदा 'आई' या विषयावर निबंध लिहायला आपण बसलो तर !             खरंतर आई 'आई होण्याआधी' मुलगी असते कुणाची तरी. आपल्या बहिणीसारखी तिच्या बाबांची लाडकी. आपण ती मुलगी असलेली आई पाहू शकत नाही पण आपल्या बहिणीसारखीच अवखळ, मैत्रिणींमध्ये रमणारी, शाळेत जाणारी, दंगामस्ती करणारी तरीही आजी-आजोबांच्या शिस्तीत, संस्कारात ती वाढलेली असते. विशी-पंचविशीत आल्यावर ती आजी-आजोबांचे घर सोडून बाबांच्या घरी येते त्यांची बायको म्हणून. केवढा मोठा बदल तिने स्वीकारलेला असतो आपल्यासाठी आणि आपल्या बाबांसाठी. बरी

अन पुन्हा पसरो मनावर सत्यतेचे चांदणे

मुलांना जन्म देताना आपला मुलगा गुंड-मवाली होईल, अफरातफर, फसवाफसवी करेल असं कुठल्याच आई-वडिलांना माहित नसतं. पण प्रत्यक्ष जर तसं झालं तर जे दुःख त्या माता-पित्यांना होतं त्याचं वर्णन होऊ शकत नाही. माणसांप्रमाणेच वस्तूंचं आणि तंत्रज्ञानाचं असतं. एखाद्या वस्तूच्या, तंत्राच्या उपयुक्ततेपेक्षा त्याचे तोटेच जर जास्त झाले तर या वस्तूच्या निर्माणकर्त्यावर पश्चातापाची वेळ येते. हिरोशिमा-नागासाकीच्या विध्वंसानंतर अणुशास्त्रज्ञांना असाच पश्चाताप झाला होता. एकविसाव्या शतकात अशीच पश्चातापाची वेळ एका कंपनीवर आली असावी असं वाटण्यास काहीच हरकत नाही. कारण आमच्या तंत्राचा, सेवेचा वापर 'सत्य' आणि 'प्रेम' पसरवण्यासाठी करा, 'असत्य' आणि 'द्वेष' पसरवू नका अशी मोठी जाहिरात करण्याची वेळ या कंपनीवर आली. हे लाडकं तंत्र, म्हणजेच मोबाईलवरील सुप्रसिद्ध अँप - whatsapp. अल्पावधीतच थोरांपासून पोरांपर्यंत whatsapp लोकप्रिय झालं, माहिती-मेसेजेस इकडून तिकडे पळू लागले, माणसे जवळ आली पण त्यानंतर मात्र हे मेसेजेस सर्वात आधी पाठवण्याच्या घाईत त्याची सत्यता पडताळून पाहायचे भान सुटले. हे भान इतक

सैराट चित्रपटाच्या पलीकडे

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन-चार आठवडे झाले. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड केले. ऐतिहासिक 'कमाई' करत चित्रपटाने नवा इतिहास रचला. चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात बऱ्याच चर्चा होत आहेत. काहीजणांनी चित्रपटाच्या आशयाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी प्रामाणिकपणे चिंता व्यक्त केली तर चित्रपटाच्या यशामुळे काहीजणांना पोटदुखी होऊन त्यांना 'संस्कृतीरक्षणाचा' कढ आला आहे आणि काही चिंतातूर जंतूंनी नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनादेखील चर्चेला घेतल्या आहेत. दोन वेगवेगळ्या जातीतील नायक-नायिका, त्यांचे प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यातून शेवटी होणारे 'ऑनर किलिंग' अर्थात प्रतिष्ठेच्यापायी केलेला खून, एवढाच विषय घेऊन केलेला हा चित्रपट. चित्रपटाकडे दोन प्रकारच्या नजरेने पाहता येते. पहिली नजर निव्वळ 'कलेची', एक सुंदर कलात्मकरीतीने केलेलं सादरीकरण म्हणून चित्रपट पाहता येतो, त्याचा आनंद घेता येतो आणि त्यातली गाणी म्हणत, गुणगुणत सोडूनदेखील देता येतो. पण दुसऱ्या नजरेने अर्थात 'सामाजिक' नजरेनेदेखील हा चित्रपट पाह