पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाईमाणूस

बाईमाणूस, ८ मार्च २०१८, जागतिक महिला दिन - केदार क्षीरसागर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपासून (१९०० ते १९२०) अमेरिका, रशिया, जर्मनी, इंग्लंड आदी देशांमध्ये स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मूलभूत हक्कांविषयीच्या मागण्या मांडायला सुरुवात केली होती. ८ मार्च १९१७ रोजी रशियातल्या वस्त्रोद्योग कामगार असलेल्या महिलांनी 'अन्न व शांतता' या विषयांशी संबंधित मागण्यांसाठी मोर्चा काढला आणि या अभूतपूर्व मोर्चातून रशियन क्रांतीची बीजं रोवली गेली. तेव्हापासून स्त्रियांच्या हक्कांच्या जागरूकतेसाठी ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून पाळला जातो. आपल्या ओळखीतल्या किंवा घरातल्याच एखाद्या मुलीने महिला दिन का साजरा करतात ? असा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता येईल का ? ते देता येण्यासाठी - स्त्री हक्क म्हणजे काय ? ते कसे मिळाले ? स्त्री चळवळीचा इतिहास काय ? हे माहिती असलं पाहिजे.  मुळात समाजातल्या संख्येने निम्म्या असलेल्या एका वर्गाचा असा दिन पाळला जातो हेच एक वेगळेपण आहे. स्त्री-वर्ग गुणवैशिष्टयांनी वेगळा आहेच पण स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळण्याची कथासुद्धा वेगळीच आहे. जगाच्या पा