पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सैराट चित्रपटाच्या पलीकडे

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन-चार आठवडे झाले. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड केले. ऐतिहासिक 'कमाई' करत चित्रपटाने नवा इतिहास रचला. चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात बऱ्याच चर्चा होत आहेत. काहीजणांनी चित्रपटाच्या आशयाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी प्रामाणिकपणे चिंता व्यक्त केली तर चित्रपटाच्या यशामुळे काहीजणांना पोटदुखी होऊन त्यांना 'संस्कृतीरक्षणाचा' कढ आला आहे आणि काही चिंतातूर जंतूंनी नागराज यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनादेखील चर्चेला घेतल्या आहेत. दोन वेगवेगळ्या जातीतील नायक-नायिका, त्यांचे प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यातून शेवटी होणारे 'ऑनर किलिंग' अर्थात प्रतिष्ठेच्यापायी केलेला खून, एवढाच विषय घेऊन केलेला हा चित्रपट. चित्रपटाकडे दोन प्रकारच्या नजरेने पाहता येते. पहिली नजर निव्वळ 'कलेची', एक सुंदर कलात्मकरीतीने केलेलं सादरीकरण म्हणून चित्रपट पाहता येतो, त्याचा आनंद घेता येतो आणि त्यातली गाणी म्हणत, गुणगुणत सोडूनदेखील देता येतो. पण दुसऱ्या नजरेने अर्थात 'सामाजिक' नजरेनेदेखील हा चित्रपट पाह

सरदार पटेलांच्या नेहरूंना शुभेच्छा

सरदार पटेलांच्या नेहरूंना शुभेच्छा ! ३१ ऑक्टोबर २०१८, केदार क्षीरसागर फक्त विकासाच्या नावावर राजकारण करण्याचं धाडस भारतामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने केलेलं नाही. आजपर्यंत विकासाबरोबरच काही भावनिक मुद्द्यांची फोडणी देत भारतीय राजकारण शिजत आलेलं आहे. या भावनिक मुद्द्यांमध्ये धर्म, जात, संस्कृती, परंपरा, इतिहास, देशाची सुरक्षा, लष्कराचं कर्तृत्व, भाषा, सण-समारंभ यांचं गरजेनुसार उदात्तीकरण, गौरवीकरण किंवा मोडतोड, विद्रुपीकरण यांचा समावेश असतो. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विकासाचा बुरखा पांघरून इतिहासाची मोडतोड आणि त्यातील पात्रांचं खलनायकीकरण करत जनतेला फुटकळ भावनिक मुद्द्यांवर 'भारून' टाकण्याचे प्रयोग केले आहेत, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावरती कोणाचं लक्ष जाऊ नये. जसजशा निवडणूका जवळ येतील तसे हे भारून टाकण्याचे प्रयोग वाढत जातील. गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतात लाखो पुतळे उभारले गेले असतील, पण त्या पुतळ्यांमधल्या व्यक्तींच्या आदर्शांवर चालण्याच्या नावाने आपल्याकडे आनंदच आहे. तरीही सत्तांतर झाल्यानंतर या नवीन सेवक मंडळाने हे 'पुतळीकरणाचे' समाजकार्य अखंडित ठेवले आहे. अरबी