पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?

आपण बोलत असताना अनेक शब्द सहजरित्या वापरत असतो किंवा इतरांकडून ऐकत असतो, पण त्यांच्या अर्थ आपल्याला पूर्णपणे समजलेला असतोच असे नाही किंवा तो अर्थ समजून घेण्याची तसदी आपण घेतोच असे नाही. काही दिवसांपूर्वी गाजत असलेला 'असहिष्णू' शब्दच घ्या, 'असहिष्णुता' म्हणजे काय ? असा विचार खोलवर जाऊन आपण कधी केलाय का ? विचार केला तरी त्या शब्दाचा व्यापक अर्थ आपल्याला समजेलच असे नाही. असाच आणखी एक शब्द आहे 'पुरोगामी'. 'महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे' असे आपण बऱ्याचवेळा ऐकले असेल, पण म्हणजे नक्की काय हे माहिती आहे काय आपल्याला ? म्हणूनच आज आपण प्रश्न विचारुयात आपल्यालाच 'पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ ?'         पुरोगामी शब्दाची एकच अशी व्याख्या करता येणार नाही पण शब्दशः अर्थ घ्यायचा तर 'पुरः' म्हणजे 'पुढे' आणि 'गामी' म्हणजे 'जाणारा', पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी या शब्दाबरोबर इतर शब्द जोडले जातात, जसे की पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळ, पुरोगामी पक्ष, संस्था, व्यक्ती, शक्ती इत्यादी. पण पुढे म्हणजे नक्की 'कुठे' हा प्र

६७ पूर्ण, ६८ चालू

जगामध्ये सात ठिकाणांना किंवा गोष्टींना 'जागतिक आश्चर्ये' म्हणून ओळखले जाते. मी नेहमी म्हणतो की 'भारत देश' हा सुद्धा या जागतिक आश्चर्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करायला हवा. यामध्ये कोणाला विनोद वाटू शकेल पण या म्हणण्यामागचा अर्थ असा की - जात, धर्म, भाषा, प्रांत, वेष, भौगोलिक परिस्थिती, राहणीमान, इतिहास इतकेच नव्हे तर विचारधारासुद्धा यांची विविधता असलेला आणि असंख्य विरोधाभासांनी भरलेला, प्रचंड लोकसंख्येचा आपला देश. हा देश गेली सत्तर वर्षे म्हणजेच १९४७ सालापासून 'चालू आहे' आणि कधीही अराजकाच्या जवळपासदेखील आपण फिरकलेलो नाही आहोत, हे जगातलं मोठं आश्चर्यच नाही काय ? थोडा विचार केला तर या 'देश चालण्यामागे आणि पुढे जाण्यामागे' निश्चितच कोणाचे तरी कष्ट आहेत. 'पुढे जाण्याचे' श्रेय कोणालाही दिले तरी 'देश चालण्याचं श्रेय' या देशाची पायाभरणी ज्यांनी केली त्या संविधानाचं आणि संविधानकर्त्यांचं आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर जे सार्वभौम भारताचं संविधान जन्माला आलं आणि भारताचं शासन ज्याच्या आधारावर गेली सत्तर वर्षे चालत आलेलं आहे ते भारताचं संविध