पोस्ट्स

स्मरण जेआरडींचे

स्मरण जेआरडींचे, २९ नोव्हेंबर २०१८ २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जेआरडी गेले, आज त्यांचा २५ वा स्मृतिदिन ! स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि पायाभू...

आईचा साठावा वाढदिवस

            लहानपणी शाळेमध्ये कधीतरी आपण 'माझी आई' असा निबंध लिहिलेला असतो. आपण मोठे होत जात असतो तसे निबंधांचे विषय बदलत जातात आणि पुन्हा कधी 'माझी आई' निबंध लिहायची वेळच येत नाही. लहानपणी खाऊ-पिऊ घालणारी, शाळेत पाठवणारी एवढीच आई आपल्याला कळलेली असते. त्यानंतर आपण मोठे होऊ तसे आई या नात्याचे अनेक पदर आपल्याला उलगडत जातात, आपल्याला आपली आई थोडी जास्ती कळू लागते, पण मदर्स डे किंवा आईच्या वाढदिवसाची पार्टी एवढ्यापुरतेच आपण व्यक्त होतो आई विषयी, ते पण खूप वरवरचे. आज म्हटलं पुन्हा एकदा 'आई' या विषयावर निबंध लिहायला आपण बसलो तर !             खरंतर आई 'आई होण्याआधी' मुलगी असते कुणाची तरी. आपल्या बहिणीसारखी तिच्या बाबांची लाडकी. आपण ती मुलगी असलेली आई पाहू शकत नाही पण आपल्या बहिणीसारखीच अवखळ, मैत्रिणींमध्ये रमणारी, शाळेत जाणारी, दंगामस्ती करणारी तरीही आजी-आजोबांच्या शिस्तीत, संस्कारात ती वाढलेली असते. विशी-पंचविशीत आल्यावर ती आजी-आजोबांचे घर सोडून बाबांच्या घरी येते त्यांची बायको म्हण...

अन पुन्हा पसरो मनावर सत्यतेचे चांदणे

मुलांना जन्म देताना आपला मुलगा गुंड-मवाली होईल, अफरातफर, फसवाफसवी करेल असं कुठल्याच आई-वडिलांना माहित नसतं. पण प्रत्यक्ष जर तसं झालं तर जे दुःख त्या माता-पित्यांना होतं त...

सैराट चित्रपटाच्या पलीकडे

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन-चार आठवडे झाले. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारुड केले. ऐतिहासिक 'कमाई' करत चित्रपटाने नवा इति...